शिवसेना नेते सतीश सावंत यांनी वेधले विभाग नियंत्रकांचे लक्ष
⚡कणकवली ता.२८-: कणकवली एसटी बस आगारातून भिरवंडे-खलांतर येथे जाणारी एसटी बस सेवा सुरू करण्यात येईल असे आश्वासन एसटी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ दिले आहे. याबाबत शिवसेना नेते सतीश सावंत यांनी त्यांच्याशी संपर्क साधून निवेदन दिले आहे.
यात म्हटले आहे की कणकवली तालुक्यातील खलांतर या गावासाठी यापूर्वी कणकवली बस स्थानकातून सकाळी ११.१५ वाजता एसटी बससेवा सुरू होती. मात्र, गेल्या काही महिन्यापासून ही बस सेवा बंद करण्यात आली आहे. सुरुवातीला कोरोनाचा कालावधी, त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप झाला. त्यामुळे ही बस सेवा बंद करण्यात आली. परंतु, आता शाळा महाविद्यालय सुरू झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
विद्यार्थ्यांना पाच ते सहा किलोमीटर लांब चालत कनेडी हायस्कूलमध्ये यावे लागत आहे. तसेच बाजाराला जाणारे नागरिक किंवा आजारी रुग्ण यांना एसटी बससेवा उपलब्ध होत नाही. अनेकांना खाजगी गाड्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे एसटी बस सेवा तात्काळ सुरू करावी अशी मागणी सतीश सावंत यांनी एसटीचे विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याकडे केली आहे. तत्वता या मागणीला त्यांनी मान्यता दिली असून तात्काळ नियोजन करून एसटी बसगाडी सोडण्याचा येईल असे नमूद केले आहे.
