आंबोली हायस्कूलच्या दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

⚡आंबोली, ता.२८-: येथील युनियन इंग्लिश स्कूल आंबोली हायस्कूल मध्ये दहावीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ आणि शिक्षकांतर्फे गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच दत्तू नार्वेकर,शाळेचे अध्यक्ष प्रकाश गावडे,संचालक शशिकांत गावडे,महादेव गावडे,दिलीप सावंत,मुख्याध्यापक एस. बी.पाटील,डी.पी.सावंत,विठ्ठल मोरे,श्री.बी.एस.बागुल,सौ.बी.बी.कांबळे,बाळाजी गावडे,सौ.संगीता गावडे,माजी सभापती आत्माराम पालेकर,ग्रामपंचायत सदस्य महेश पावसकर,शंकर चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण तेंडुलकर,गणपत पाटील,सामाजिक कार्यकर्ते यशवंत सावंत,अविनाश सावंत,कृष्णा पाखरे,विजय राऊत,अनिल चव्हाण उपस्थित होते.यावेळी प्रथम क्रमांक आलेल्या कूमारी ममता पाखरे,द्वितीय आलेल्या अंकिता गावडे,तृतीय क्रमांक साक्षी गावडे,वैष्णवी धुरी,निखिल गावडे यांचा सत्कार शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ,वह्या देवून करण्यात आला.आंबोली पंचक्रोशी सर्वांगीण विकास संस्थेतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले.

You cannot copy content of this page