दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्यावतीने ऑनलाईन वेबिनार
⚡कणकवली ता.२८-: राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या वतीने ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना कणकवली येथील ॲड. स्वाती गोपाळ तेली यांनी शाहू महाराजांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य याबद्दल मार्गदर्शन केले.
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञाकाढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.
लोककल्याणकारी राजा अशी उपाधी त्यांना जनतेने बहाल केली होती असे सांगितले.
यावेळी सिध्दार्थ तांबे,नरेंद्र तांबे,स्नेहल तांबे, सुभाष कदम (सचिव),नितीन कदम,सुगंध तांबे,अवंतिका तांबे,अनिल तांबेप्रज्ञा कदम,शुभा जाधव,संदेश कदम आदीं सहभागी झाले होते.सूत्रसंचालन स्नेहल तांबे यांनी केले.
