महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेमधील २ लाखांवरील कर्जमाफी द्या…

आंबा व काजू बागायतदार विचार मंचाची वेंगुर्ला तहसीलदार यांच्याकडे मागणी…

⚡वेंगुर्ला ता.२२-: वेंगुर्ला तालुक्यातील आंबा व काजू बागायतदार विचार मंचाचे सदस्य तसेच सर्व बागायतदार यांनी सन २०१५ मे २०१९ मधील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधील २ लाखांवरील कर्जमाफी मिळावी असे निवेदन वेंगुर्ला तहसिलदार यांना दिले आहे.

  सल २०१५ ते २०१९ मधील महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमधील २ लाखांवरील कर्जमाफी मिळण्याबाबत शासनाने शेतक-यांना २ लाखांपर्यंत माफी दिली. परंतु, महत्त्वाची बाब म्हणजे २ लाखांपर्यंत मुद्दल असणा-या शेतक-याला व्याजामुळे शेतक-याला त्या कर्जमाफीच्या लाभांपासून वंचित रहावे लागले आहे. तरी शासनाने याचा गांभीर्याने विचार करुन आम्हा सर्व शेतक-यांना कर्जमुक्त करावे. तसेच ३० सप्टेंबरपर्यंत शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला. परंतु, राज्यशासनाने शेतक-यांना दिलासा म्हणून ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत तरी याचा कालावधी वाढवून द्यावा आणि २०१५ ते डिसेंबर २०१९ पर्यंत २ लाखांवरील निर्णय घेऊन शेतक-यांचा सातबारा कोरा करुन द्यावा असे निवेदनात नमूद केले आहे.

  यावेळी जयप्रकाश चमणकर, हनुमंत आंगचेकर, अनंत प्रभू, किशोर नरसुले, अॅड.प्रकाश बोवलेकर, शामसुंदर राय, राजेश परब आदी उपस्थित होते.
You cannot copy content of this page