२०२१-२२ मधील फळपीक विमा नुकसान भरपाई ४५ दिवसांत तात्काळ जमा करा…

आंबा व काजू बागायतदार मंचाची कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी…

⚡वेंगुर्ला ता.२२-: सन २०२१-२०२२ मधील फळपीक विमा नुकसान भरपाई ४५ दिवसांत तत्काळ जमा करावी अशी मागणी वेंगुर्ला तालुक्यातील आंबा व काजू बागायतदार विचार मंचाचे सदस्य तसेच सर्व बागायतदार यांनी वेंगुर्ला तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे लेखी निवदेनाद्वारे केली आहे.

  डिसेंबरपासून सातत्याने अवकाळ१ी पाऊस राहिला आहे. या अवकाळी पाऊसाचा फटका आंबा व काजू बागायतदारांना बसला आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना किडी रोगाच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे. यावर्षी शेतक-यांना फवारणी औषधे तसेच खते व बँक कर्ज घेण्यासाठी मेटाकुटीस यावे लागले आहे. यावर राज्य व केंद्रशासनाने तसेच रिलायन्स जनरल इन्शुरन्स विमा कंपनीने शेतक-यांना तात्काळ विमा नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात शासनस्तरावर पत्रव्यवहार करावा अशीही मागणी केली आहे.  यावेळी जयप्रकाश चमणकर, हनुमंत आंगचेकर, अनंत प्रभू, किशोर नरसुले, अॅड.प्रकाश बोवलेकर, शामसुंदर राय, राजेश परब आदी उपस्थित होते.
You cannot copy content of this page