⚡वेंगुर्ला ता.२२-: भाजपा तुळसाच्यावतीने दहावी उत्तीर्ण झालेल्या अणसूर-पाल हायस्कूलमधील रितू सद्गुरु परब, सोहम कृष्णा परब, श्री शिवाजी हायस्कूल तुळसमधील अथर्व दामले, वैष्णवी तुळसकर, दीक्षा गोळम, पल्लवी शिरोडकर तर न्यू इंग्लिश स्कूल उभादांडामधील धनश्री तांडेल या तुळस गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच शंकर घारे, माजी उपसरपंच जयवंत तुळसकर, तुळस शक्ती केंद्रप्रमुख संतोष शेटकर, रामचंद्र परब, प्रदिप सावंत, सचिन नाईक, कृष्णा राऊळ आदी उपस्थित होते.
