वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

शहर अध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी राबवली होती संकल्पना…

⚡सावंतवाडी ता.२२-: गेल्या दहा दिवसात प्रदीप कांबळे यांनी केलेल्या आवाहन ला देणगी स्वरुपात आणि शैक्षणिक साहित्य स्वरूपात दातृत्व वृत्ती दाखवत काही मदतकर्त्यानी बहुमोल मदत केली. आणि काल ओटवणे, तांबुळी, नेमळे, झाराप आणि शिरशिंगे या गावातील गरीब गरजू मुलांना त्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या साहित्यात वह्या, ड्रॉइंग बुक, कंपास बॉक्स, स्केचपेन, पेन पेन्सिल, शार्पनर, रबर, छत्र्या असे वाटप करण्यात आले.

या मदत कार्यात वंचित बहुजन आघाडी विधानसभा 2019 चे उमेदवार आणि माजी भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष मा. सत्यवान जाधव (सावंतवाडी), भारतीय बौद्ध महासभा सावंतवाडी तालुकाध्यक्ष लक्ष्मण निगुडकर, आनंद द. कदम (मालवण), मा. अभिषेक कदम (मालवण), सामाजिक बांधीलकी सावंतवाडीचे सामाजिक क्षेत्रात कायम सहभागी असणारे मा. रवी जाधव (सावंतवाडी), मा. संदीप जाधव (तळवडे), वंचित बहुजन आघाडी सावंतवाडी संघटक मिलिंद नेमळेकर, प्राथमिक शिक्षक शांताराम असनियेकर, अभय चव्हाण यांनी मोलाचे योगदान दिले.

वंचित बहुजन आघाडीचे संदीप जाधव, प्रदीप कांबळे, मा. सत्यवान जाधव आणि मा. लक्ष्मण नीगुडकर यांनी गावांमध्ये जाऊन साहित्याचे वाटप केले.

You cannot copy content of this page