चंद्रशेखर मादकर, महादेव करंगळे यांचा समावेश
वेंगुर्ले ता.२१-: बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी श्री चंद्रशेखर बाबुराव माडकर हे आपल्या 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर व श्री महादेव शंकर करंगळे हे आपल्या 26 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.
त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित निरोप समारंभा मध्ये श्री चंद्रशेखर माडकर व श्री महादेव करंगळे यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
श्री चंद्रशेखर माडकर आणि श्री महादेव करंगळे यांनी प्रामाणिकपणे दिलेल्या सेवेचा गौरवपूर्ण उल्लेख करताना प्रा. भेंडवडे एसटी, प्रा. नंदगिरीकर व्ही.पी. प्रा. आरोलकर डी.आर.प्रा.चुकेवाड एस.जी .प्रा.बांदेकर ए.पी.प्रा.विरेंद्र देसाई ,श्री.शितोळे डी.जे. श्री सुरेंद्र चव्हाण. श्री संजय पाटील व सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक श्री. अशोक सावळे , सौ.सुमन करंगळे-सावंत व माडकर यांच्या भगीनी ज्योती माडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री विलास देऊलकर यांनी श्री चंद्रशेखर माडकर व श्री महादेव करंगळे यांनी प्रशासनाला दिलेल्या सहकार्याबद्दल व केलेल्या प्रामाणिक सेवेबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री विलास देऊलकर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आनंद बांदेकर कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा.
. शितोळे डीजे. श्री सुरेंद्र चव्हाण उपस्थित होते
श्री.महादेव करंगळे आणि श्री चंद्रशेखर माडकर यांनी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर या संस्थेने सेवा करण्याची संधी दिली याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक प्राचार्य
डॉ.कै.एम .आर. देसाई , माजी आमदार कै दीलीपराव देसाई , विद्यमान सचिव माननीय श्री.जयकुमार देसाई,पेट्रन कौन्सिल मेंबर श्री.दौलतराव देसाई आणि प्रशासनाधिकारी मा.सौ.मंजिरी मोरे-देसाई आणि प्राचार्य व इतर सर्व प्राध्यापक, कर्मचारी आभार मानले.
या सत्कार समारंभासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक श्री संजय पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. आनंद बांदेकर यांनी केले.
