सरपंच, ग्रामसेवक यांच्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा

२३ रोजी कणकवली, २४ रोजी सावंतवाडी येथे आयोजन:पाटोदा माजी सरपंच भास्कर पेरे पाटील, मंदार साठे करणार मार्गदर्शन

ओरोस ता.२२-: स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा -2 व जल जीवन मिशन अंतर्गत कामाना गती देण्याकरीता जिल्ह्यात 23 व 24 जुन रोजी सरपंच व ग्रामसेवक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेकरीता भास्कर पेरे पाटिल, माजी सरपंच पाटोदा, मंदार साठे, सल्लागार युनिसेफ मुंबई यांचे मार्गदर्शन लाभाणार आहे. या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक यांनी उपस्थित राहवे असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी केले आहे.


जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन स्वच्छ भारत मिशन (ग्रा) व जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सुरु असना-या कामांना गती देण्याकरीता देवगड, वैभववाडी, कणकवली व मालवण तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांच्या करीता 23 जुन 2022 रोजी सकाळी 10 ते 4.30 वाजता या कालावधीत भगवती मंगल कार्यालय , कणकवली येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तर 24 जुन 2022 रोजी सकाळी 10 ते 4.30 वाजता या कालावधीत सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ व वेंगुर्ला या तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक यांच्या करिता सावतवाडी येथिल भगवती मंगल कार्यालय, मळगाव येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळे करीता जल जीवन मिशन कार्यक्रम तांत्रिक व प्रशासकिय माहिती मंदार साठे उपस्थित सर्व सरपंच व ग्रामसेवक यांना देणार आहेत. तसेच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जल जीवन मिशन अंतर्गत काम करत असताना येणा-या अडचणी बाबत सरपंच ग्रामसेवक यांच्याशी थेट संवाद करण्यात येणार आहे. तर जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत सरपंच व ग्रामसेवक यांची भुमिका व जबाबदारी याबाबत पाटोदा माजी सरपंच भास्कर पेरे पाटिल हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या कार्यशाळेत उपस्थिताना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व सरपंच व ग्रामसेवक यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहवे असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page