⚡सावंतवाडी ता.२०-: अंशता चाळीस टक्के अनुदानित शाळांचे शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पगार गेले दोन महिने झालेच नाही आहेत. त्याचप्रमाणे वाढीव थकित अनुदान गेली दोन वर्ष दिले गेले नाही. पुढील टप्पा देखील लवकरात लवकर मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे कारिवडे येथील अप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापिका अर्चना सावंत शेटये यांनी शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्याकडे केली आहे.
यावेळी या शाळां मधील शिक्षक व कर्मचाऱ्यांचा पगाराचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही आमदार पाटील यांनी दिली आहे.
