सैनिक पतसंस्थेचे सीईओ सुनील राऊळ यांचा सह्याद्री फाउंडेशनने केला सत्कार

जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांनी केला सन्मान;राऊळ यांना सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार झालाय प्राप्त

⚡सावंतवाडी ता.२०-: सकाळ माध्यम समूहाकडून सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांना “सकाळ ऑयडाॅल ऑफ महाराष्ट्र” हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सह्याद्री फाउंडेशन च्या वतीने जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर व मित्र परिवाराकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

संस्थेत काम करत असताना एक कर्मचारी ते मुख्य कार्यकारी अधिकारी या पदापर्यंत श्री राऊळ यांनी घेतलेली झेप लक्षात घेता त्यांना सकाळ समूहाकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापूर येथील हॉटेल सयाजी मध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरित करण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर व मित्र परिवाराकडून त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी संतोष सावंत, प्रल्हाद तावडे, सुहास सावंत, प्रताप परब,आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page