⚡मालवण ता.२०-: खातीजाबी सदरुद्धिन काझी ट्रस्ट मुंबई- आचरा तर्फे आचरा येथील उर्दू शाळेच्या ४८ विद्यार्थ्यांना छत्र्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साजिद मुजावर, मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे लतिफ मुजावर, मुख्याध्यापक निसार सोलकर, शिक्षक मुस्ताक सय्यद, तसेच जुलेखा आगा, अजहरुन्निसा सोलकर आदी उपस्थित होते.
