⚡मालवण ता.२०-: भाजपचे मालवण तालूकाध्यक्ष आणि माजी सभापती धोंडू चिंदरकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्र शाळा आचरे नंबर १ या शाळेला फुलझाडे भेट दिली. यावेळी चिंदरकर यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून बगीचा सुशोभीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
धोंडू चिंदरकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केंद्र शाळा आचरे नंबर १ ला बगीचा सुशोभीकरणासाठी दिलेल्या मिनी टगर, मेलोस्थमा, मुसांडा आदी प्रकारच्या पन्नास रोपांची लागवडीचा शुभारंभ चिंदरकर यांच्या हस्ते केला गेला. यावेळी त्यांच्या सोबत व्यासपीठावर माजी सभापती निलिमा सावंत, राजन गांवकर, हडी सरपंच महेश मांजरेकर,जयप्रकाश परुळेकर, अवधूत हळदणकर, संतोष मिराशी, डॉ प्रमोद कोळंबकर, प्रथमेश घाडी, मनाली मिराशी, प्रकाश मेस्त्री, संतोष गांवकर, शेखर कांबळी, मनोज हडकर,उदय घाडी, विजय कदम, केंद्र प्रमुख सुगंधी गुरव, मुख्याध्यापिका स्मिता जोशी यांच्यासह पालक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.
