विविध दर्जेदार कार्यक्रम सादर करीत कर्मचाऱ्यांनी आणली रंगत
ओरोस ता.१६-:
एकेरी नृत्य, समूह नृत्य, पोवाडा, गीत, अभंग, नाट्यगीत, लावणी असे एकापेक्षा एक कार्यक्रम सादर करीत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलन यादगार बनविले. यातून कर्मचाऱ्यांत असलेल्या कलेला भव्य व्यासपीठ मिळाल्याने कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
तब्बल ६४ कार्यक्रमांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवनच्या भव्य व आकर्षक व्यासपीठावर हे दमदार कार्यक्रम सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात झाली. सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या योग्य नियोजनामुळे व राजेश कदम यांच्या अष्टपैलू सूत्रसंचालनामुळे या कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली.
