मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याहस्ते झाले वितरण
ओरोस ता.१६-:
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आपल्या ७१ कर्मचाऱ्यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार देवून बुधवारी सन्मानित करण्यात आले. शाल, कल्पवृक्ष रोप व सन्मानपत्र देवून हा पुरस्कार बहाल करण्यात आला. सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात हे पुरस्कार वितरित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण, वैभववाडी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, कणकवली – देवगड गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, वेंगुर्ला गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, समाजकल्याण अधिकारी शाम चव्हाण, जिल्हा पाणी व स्वच्छता उपमुख्य अधिकारी विनायक ठाकूर, जिल्हा पशसंवर्धन विकास अधिकारी डॉ विद्यानंद देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलिपे, माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर आदी उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभाग, वित्त, आरोग्य, कृषी, बांधकाम, पशुंवर्धन, शिक्षण, ग्रामीण पाणी पुरवठा, कंत्राटी कर्मचारी या प्रत्येक विभागातून हे पुरस्कार देण्यात आले.
