जिल्हा रुग्णालय मेडिकल कॉलेजला हस्तांतरण केल्याने कंत्राटी कर्मचारी होणार कमी

जिल्हा शल्य चिकित्सक पद सुद्धा होणार खालसा;भाजप शिष्टमंडळाला डॉ पाटील यांनी दिली माहिती

ओरोस ता.१६-:

सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजला जिल्हा सामान्य रुग्णालय वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे येथील कर्मचारी मेडिकल कॉलेजला हस्तांतरित करण्यात येत असून एनएचएम अंतर्गत कार्यरत ५१ कर्मचारी कमी करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. काही दिवसांत जिल्हा शल्य चिकित्सक हे पद सुद्धा खालसा होणार आहे, अशी गंभीर माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली चर्चा करण्यास गेलेल्या भाजपच्या शिष्टमंडळाला दिली.


एनएचएम अंतर्गत सलग १२ ते १३ वर्षे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करू नये, ही मागणी करण्यासाठी निलेश राणे व भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आज जिल्हा जिल्हा रुग्णालयात भेट दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पाटील, शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन डॉ सत्यवान मोरे यांच्यासह भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक संचालक बाबा परब, आनंद शिरवलकर, विनायक राणे, रुपेश कानडे, पप्या टवटे, दीपक नारकर, पांडुरंग मालवणकर, सुप्रिया वालावलकर यांच्यासह असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page