उपाध्यक्षपदी मनोहर पालयेकर तर सचिवपदी विलास चव्हाण
⚡कणकवली ता.१६-: कणकवली तालुका पेंशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी सिताराम उर्फ दादा कुडतरकर , उपाध्यक्षपदी मनोहर पालयेकर , सचिवपदी विलास चव्हाण तर खजिनदारपदी विश्वनाथ केरकर यांची तर सल्लागारपदी प्रा . पी . जी . पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली
कणकवली येथील महाराजा मंगल कार्यालयात तालुका पेंशनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच प्रा . पी . जी . पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली . यावेळी जिल्हा पेंशनर्स सेवा संघाचे मनोहर आंबेरकर , जिल्हा उपकोषागार अधिकारी प्रमोद चिंदरकर व इतर मान्यवर उपस्थित होते . यावेळी श्री . चिंदरकर यांनी सेवानिवृत्ती दारिकांना शासनाने दिलेल्या लाभाची माहिती दिली . तर श्री . आंबेरकर यांनी कणकवली पेंशनर्सची मोठी ताकद आहे . म्हणून त्यांनी स्वत : ची इमारत उभारली हे कौतुकास्पद आहे , असे सांगितले तर मनोहर पालयेकर यांनी २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांनाही पेंशन मिळाली पाहिजे , तो त्यांचा हक्क असल्याचे संगितले . यावेळी दादा कुडतरकर , मोहन सावंत , परशुराम साधले यांनी विचार मांडले . प्रास्ताविक पी . जी . पाटील यांनी केले इतिवृत्त वाचन भिकाजी जामदार यांनी तर सुत्रसंचालन विश्वनाथ केरकर यांनी केले .
