बॅ.खर्डेकरच्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव

⚡वेंगुर्ला ता.१६-: बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या बॅ.खर्डेकर महाविद्यायलातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ १५ जून रोजी संपन्न झाला. कष्ट, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास यांच्या सहाय्याने यश मिळविता येते असे सांगत प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांनी दिव्यांग विद्यार्थी श्रृती पाटील व सोहम नेरुरकर यांचा उल्लेख केला.

  यात सिधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त दिक्षा तोंडवळकर व विज्ञान शाखेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त राजवीर देसाई यांचा तर श्रृती पाटील, चातुर्या तांडेल, सोहम नेरुरकर (कला), योजना नवार, रश्मी पताडे, मानसी आंदुर्लेकर (वाणिज्य), दिक्षा तोंडवळकर, राजवीर देसाई, अजिक्य डिसोजा (विज्ञान), निहाल जानी, भूषण प्रभू, मयुर सावंत, दिव्या दळवी (व्होकेशनल) या अनुक्रमे तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मानचिन्ह देऊन

करण्यात आला.

  या कार्यक्रमाला कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.डि.जे.शितोळे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.भेंडवडे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आनंद बांदेकर, सुरेंद्र चव्हाण, प्रा.आर.आर.पार्सेकर, प्रा.एस.एस.देशपांडे यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
You cannot copy content of this page