सद्गुरु मियांसाब यांचा कोलगाव समाधीस्थानी 24 रोजी पुण्यतिथी उत्सव

⚡सावंतवाडी ता.१६-: प. पू. श्री सद्गुरु मियांसाब यांचा ७७ वा पुण्यतिथी उत्सव शुक्रवार २४ जून रोजी कोलगाव येथील समाधीस्थानी साजरा होणार आहे तरी भक्तगणांनी उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे

77 व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यात सकाळी ८.०० ते १०.०० श्री सद्गुरु पूजन, सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० श्रींची प्रार्थना, नामस्मरण ( चादर अर्पण करणे ), दुपारी १२.०० ते ३.००, महाप्रसाद, दुपारी ३.०० ते सायं. ६.०० नामस्मरण / कीर्तन, सायं. ६.०० ते रात्रौ ८.०० ज्ञानेश्वरी / श्री एकनाथ भागवत वाचन रात्री 10 ते 12 श्रींचे भजन, श्री हरिपाठ, आरती आदी कार्यक्रम होणार आहेत महाप्रसादामध्ये ज्या भक्तांना सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी श्री. राणेसाहेब यांच्याशी संपर्क साधावा तसेच ज्या भक्तांना देणगी द्यावयाची असेल त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सावंतवाडी नांव : श्री. सद्गुरु मियांसाब भक्त सेवा मंडळ Account No. 20063674423 | IFSC CODE: MAHB0000071

You cannot copy content of this page