श्रावण नं. १ शाळेला योगिता परब यांनी दिला संगणक

⚡कणकवली ता.१६-: महात्मा गांधी विद्यालय शाळा श्रावण नं. १ शाळेत नवागतांचा स्वागत उत्सव आणि शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात श्रावण गावातील सामाजिक कार्यकर्ते दिवंगत प्रभाकर परब यांच्या स्मरणार्थ प्रफुल्लता प्रभाकर परब यांनी परिवाराच्या वतीने शाळेला नवीन संगणक देणगी म्हणून प्रदान केला.

पुणे महानगरपालिकेतील कामगार नेते तथा श्रावण शाळेचे माजी विद्यार्थी अनंत मालप यांनी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. तसेच श्रावण गावातील सरपंच प्रशांत परब, , उपसरपंच हर्षदा हरेश चव्हाण, उद्योजक विनू कुबल यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. प्रथम श्रावण नं.१ शाळा ते श्रावण बाजारपेठ अशी प्रभात फेरी काढण्यात आली.यानंतर इयत्ता पहिलीत दाखल झालेले विद्यार्थी पार्थ सुनील वेधरे व परी प्रकाश यादव यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर सरपंच प्रशांत परब, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक दोन चे उद्घाटन सरपंच प्रशांत परब यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्याला शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित, कामगार नेते अनंत मालप, विश्वनाथ लठकत आणि सरपंच प्रशांत परब यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक दोन मध्ये मांडण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या टेबल प्रमाणे पहिलीचे विद्यार्थी आणि उपस्थितांना माहिती देण्यात आली. ही माहिती अंगणवाडी सेविका पायल परब, मदतनीस नूतन श्रावणकर, मुख्याध्यापक स्मिता किंजवडेकर, सहकारी शिक्षक साक्षी कुबल, रागिनी ठाकूर, सचिन घोटाळे यांनी दिली. या संपूर्ण कार्यक्रमात सरपंच प्रशांत परब, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवराम परब, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घाडी, रागिनी पवार, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संभाजी परब, अंगणवाडी सेविका पायल परब, संगणक देणगीदाते योगिता परब, शैक्षणिक साहित्य देणगीदाते अनंत मालप, विश्वनाथ लठकत, शंकर बैरट, आडवली हायस्कूलचे चेअरमन कमलाकांत कुबल, , पालक शिक्षक संघाचे सदस्य नागेश परब व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्मिता किंजवडेकर, विनायक हरकुळकर, साक्षी कुबल, रागिनी ठाकूर, सचिन घोटाळे, पायल परब, नूतन श्रावणकर, शिवराम परब, अनिल पवार, सुवर्णा दळवी, रोहिणी पवार आणि सर्व स्वयंसेवक यांनी अपार मेहनत घेतली. सुत्रसंचलन व आभार विनायक हरकुळकर यांनी मानले.

You cannot copy content of this page