⚡कणकवली ता.१६-: आशिये गाव हा सर्वच क्षेत्रात प्रगत व्हावा,यादृष्टीने आम्ही सातत्याने काम करत आहोत. शैक्षणिक क्षेत्रात देखील पूर्वा चव्हाण हिच्यासारखी काही रत्ने आहेत.एस. एम. जुनियर कॉलेज मध्ये बारावी परीक्षेत पूर्वा मंगेश चव्हाण हिने ८४ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवून गावाच्या नावलौकिकात भर घातली, असे कौतुकोद्गार माजी उपसभापती महेश गुरव यांनी काढले.
आशिये गावाच्या वतीने पूर्वा चव्हाण हिच्या आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी पूर्वा मंगेश चव्हाण हिला पेढे भरवत पुष्पगुच्छ व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उपसरपंच संदीप जाधव,सत्यवान गुरव,संतोष जाधव, निखिल जाधव,सचिन गुरव, प्रकाश गुरव, अनिकेत जाधव, रुपेश लाड,स्वप्निल गुरव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
