Headlines

वळवडे ते नांदगाव तिठा महामार्गाच्या दुतर्फा वाढलेली धोकादायक झाडे तात्काळ तोडा…

⚡देवगड ता.१५-: देवगड निपाणी महामार्गावरील वळीवंडे ते नांदगाव तिठा या मार्गावरील वळणावळणाच्या रस्त्यात अनेक मोठी झाडे ,तसेच झुडपे ही मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने प्रसंगी ती गाड्यांचे बाजूला घासणे तसेच समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने छोटे मोठे अपघात घडत आहेत .प्रसंगी रस्त्याच्या साईड पट्टी देखील काही ठिकाणी खचल्याने वाहने रुतण्याची भीती ही निर्माण झाली आहे.त्यामुळे या मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी प्रसंगी वाढलेल्या फांद्या ही तात्काळ तोडण्यात याव्यात.अशी मागणी वाहन चालकांमधून होत आहे.

या मार्गावर चारचाकी वाहने,ट्रक टेम्पो यांची वर्दळ वाढली असल्याने ऐन पावसाळी हंगामात रात्रौच्या या वाढलेल्या झाड्याच्या फांद्या व झुडपे ही अधिक धोकेदायक झाली आहेत त्यामुळे सा बा विभागामार्फत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.अशी मागणीही होत आहे.

You cannot copy content of this page