सातार्डा पुलाखाली चौकुळच्या इसमाचा मृतदेह

ग्रंथालयातील पुस्तकाच्या माध्यमातून पटली ओळख : पेडणे पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

⚡सावंतवाडी ता.१५-: पेडणे न्हयबाग येथील सातार्डा पुलाखाली चौकुळ येथील एक इसमाचा मृतदेह आढळला ही घटना काल सकाळी 11 च्या सुमारास उघडकीस आली अनिल विठ्ठल गावडे असे त्याचे नाव आहे त्याच्याकडे असलेल्या ग्रंथालयातील पुस्तकाच्या माध्यमातून त्याची ओळख पटली त्यानुसार पेडणे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती पेडणे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विवेक हळणकर यांनी दिली

याबाबत अधिक वृत्त अस की
गावडे हे पडणे येथे कामाला होते काल सकाळी 11 च्या सुमारास पेडणे न्हयबाग येथील सातार्डा पुलाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला. ही बाब तेथील नागरिकांच्या निदर्शनास येताच याबाबत ची माहिती त्यांनी पेडणे पोलिसांना दिली त्यानुसार पेडणे पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. यावेळी गावडे यांच्याजवळ एक ग्रंथालयातील पुस्तकाच्या आढळून आले. यावर सावंतवाडी चौकुळ येथील एका ग्रंथालयाचे नाव व गाव चौकुळ असे लिहिलेले होते. त्यानुसार पेडणे पोलिसांनी आंबोली दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई यांच्याशी संपर्क साधता याबाबत माहिती दिली.त्यानुसार चौकुळ पोलीस पाटील यांना फोटो पाठवून खात्री केली असता संबंधित इसम चौकुळ येथील असल्याची ओळख पटली.संबंधित इसमाच्या सर्वेक्षण करण्यात आले यात नैसर्गिक मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

You cannot copy content of this page