⚡देवगड ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीवर सदस्य म्हणून देवगड तालुक्यातून तालुका पत्रकार समितीचे सदस्य राजेंद्र मुंबरकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. देवगड तालुका पत्रकार समितीच्या बुधवारी झालेल्या विशेष सभेत ही निवड जाहीर करण्यात आली.
येथील शासकीय विश्रामगृह येथे देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दयानंद मांगले, अनिल राणे, सचिव सचिन लळीत, सहसचिव महेश तेली, कार्यकारिणी सदस्य प्रशांत वाडेकर, संतोष कुलकर्णी, सुरज कोयंडे, गणेश आचरेकर, रत्नदीप कांबळे आदी उपस्थित होते. या सभेत जिल्हा पत्रकार संघाची २७ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीची माहिती पत्रकार समितीचे तालुकाध्यक्ष गावकर यांनी दिली. यावेळी श्री. मुंबरकर यांची जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याचे गावकर यांनी जाहीर केले.
