गुळदुवे येथील कोसळलेला तो वटवृक्ष अजूनही स्त्यावरच.

अपघात होण्याची दाट शक्यता

⚡सावंतवाडी ता.१५सहदेव राऊळ-: मागील सतत दोन दिवस पडणाऱ्या पहिल्याच पावसामूळे गुळदुवे (घोगळे वाडी) येथील वटवृक्षाला फटका बसला होता.

रस्त्याच्या बाजूला असणारा वटवृक्ष पहाटे पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर कोसळला होता, मात्र चार दिवस झाले तरी याची दखल कोणीही घेतली नाही. जर हा वटवृक्ष असाच राहिला तर मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी संबंधित खात्याने यात लक्ष घालून लवकरात लवकर याबाबत कार्यवाही करावी, अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. सध्यस्थितीत यामुळे वाहनधारकाना कसरत करून आपली वाहने बाहेर काढावी लागत आहेत.

You cannot copy content of this page