विद्याधर देसाई:आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचा प्रवेशोत्सव संपन्न*
⚡सावंतवाडी ता.१५सहदेव राऊळ-: सर्वच मुले चांगली असून, शाळेची शैक्षणिक प्रगती अशीच वाढविण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असे प्रतिपादन आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचे मुख्याद्यापक विद्याधर देसाई यांनी केले.
तालुक्यातील आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल, आरोस येथे नवीन शैक्षणीक वर्ष २०२२-२३ प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मुलांचे स्वागत करताना देसाई बोलत होते. यावेळी शिक्षक एल. के. सावंत, शिक्षक अनिल नाईक, चव्हाण मॅडम, लिपिक तानाजी खोत, शिक्षकेतर कर्मचारी लक्ष्मण शेळके, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली. शिक्षक तानाजी वरक यांनी नवीन दाखल झालेल्या विद्यार्थी यांना शाळेबद्दल माहिती देत सर्वांच्या सहकार्याने शाळेची प्रगती दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगितले. यावेळी नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके वितरण करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना शिक्षक अनिल नाईक यांनी तर आभार तानाजी वरक यांनी मानले.
