चालक कम वाहक महेश अलिग्रे यांचे उपचारा दरम्यान निधन

देवगड
देवगड आगारातील चालक कम वाहक सेवा बजावीत असलेले चालक महेश रघुनाथ अतिग्रे यांचे पुणे देवगड ही प्रवासी फेरी घेऊन येत असताना अपघात झाला व त्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याचे रुग्णालयात उपचार घेत असताना दुर्दैवी निधन झाले होते त्यांना देवगड आगारातील अधिकारी कर्मचारी वर्गातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.मंगळवारी सकाळी देवगड बसस्थानकावर स्थानक प्रमुख एल.एम.सरवदे लेखाधिकारी श्रीकांत शेळके रोखपाल चेतन वळंजू,वाहतूक नियंत्रक एम.एस.चव्हाण उमेश मोहिते ,जेष्ठ चालक नामदेव कांबळे,वाय. एल.देशमुख,अन्य चालक वाहक यांच्या उपस्थितीत महेश अतिग्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण केली.

You cannot copy content of this page