अन्यथा जनता पेटून उठेल;तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांचा इशारा
⚡सावंतवाडी ता.१४-: भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील सरकार राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्यावर सूडबुद्धीने व आकसाने कारवाई करून काँग्रेस पक्षाचा आवाज दाबू पाहत आहेत ही बाब गंभीर असून भाजपच्या केंद्र सरकारने हे वेळीच थांबवले नाही तर जनता पेटून उठेल याची किंमत येणाऱ्या काळामध्ये मोदी सरकारला मोजावी लागेल अशी टीका महेंद्र सांगेलकर यांनी केली आहे.
तसेच गांधी घराण्याने देशासाठी बलिदान दिले त्याच गांधी घराण्यातील राहुल गांधी व सोनिया गांधी यांना तुरुंगात दाबू पाहत आहेत ही बाब अत्यंत दुर्दैवी व खेदजनक असून तालुका काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध केला आहे
