मालवण प्रीमियर लीग २०२६’ चे बिगुल वाजले…
⚡मालवण, ता.०५-:
मालवणकरांच्या क्रीडाप्रेमाला नवी उभारी देण्यासाठी आणि स्थानिक क्रिकेट कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मालवण स्पोर्ट्स क्लब सज्ज झाला आहे. यंदा या स्पर्धेचे दिमाखदार ९ वे वर्ष असून अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी मालवण प्रीमियर लीग २०२६ ही लेदर बॉल टी-२० क्रिकेट स्पर्धा २२ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघांना अनुक्रमे ५५ हजार रुपये, ३३ हजार रुपये व आकर्षक चषक दिला जाणार आहे. या स्पर्धेत सहभागासाठी प्रवेश फी १५ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. स्पर्धेचे स्वरूप मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्या ८ संघांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. तरी इच्छुक संघ मालकांनी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी सुशील शेडगे- ७४९९९५५१४७, ज्ञानेश केळुसकर- ९३२५२३३३७९ यांच्याशी संपर्क साधावा.
ज्या वैयक्तिक खेळाडूंना या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवायचा आहे, त्यांच्यासाठी फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गुडलाईफ मेडिकल विदर्भ कोकण बँकेसमोर, भंडारी हायस्कुल रोड, मालवण येथे १० फेब्रुवारी पर्यंत २०० रुपये फॉर्म फी देऊन फॉर्म भरायचा आहे. जे खेळाडू फॉर्म भरूनही लिलावात अनसोल्ड राहतील, त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मालवण स्पोर्ट्स क्लब त्यांना लेदर बॉलचा एक विशेष प्रदर्शनीय सामना खेळण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे.
क्रीडाप्रेमींनी या क्रिकेट उत्सवाचा आनंद घेण्यासाठी आणि आपल्या लाडक्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
