कणकवली ता.०४-:* रामकृष्ण परमहंस यांचे परम शिष्य स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. या मिशनचे ‘आत्मनो मोक्षार्थं जगद हितायच हे बीद्र वाक्य असून त्यानुसार मिशनचे कार्य चालते. रामकृष्ण मिशनचे मुख्यालय हे बेरूल,कलकत्ता, पश्चिम बंगाल येथे आहे.
रामकृष्ण मिशनच्या देशभरात विविध प्रांतांमध्ये शाखा असून या शाखांच्या माध्यमातून रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांची शिकवण जनमानसांत पोहोचवण्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रम राबवून सामाजिकदायित्वाचे कार्य केले जात आहे अशाप्रकारचे कार्य पिसुर्ले (गोवा) येथील शाखेच्या माध्यमातून रामकृष्ण व विवेकानंदांचे कार्याचा वसा नि:स्वार्थपणे करीत आहेत. पोफळी व मांडांची मोठ्या प्रमाणात झाड्यांसह निसर्गसंपन्न असलेल्या पिसुर्ले गावात रामकृष्ण मिशनची ( उसगाव, खांडेपार, ता. फोंडा, गोवा) याठिकाणी शाखा आहे. या शाखेच्या माध्यमातून रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांची शिकवण जनमानसांत पोहोचवण्यासाठी त्यांचे शिष्य निःस्वार्थपणे कार्य करीत आहेत.
या शाखेतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जात आहेत. या शाखतर्फे रुग्णालय चालवते जाते. या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर माफत दरात उपचार केले जातात. याशिवाय अर्धांगवायु धक्का आलेल्या रुग्णांना पुन्हा रिकव्हर होण्यासाठी ज्या वैद्यकीय उपचार पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धती याठिकाणी उपलब्ध असून याठिकाणी उपाचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मार्फत दर आकरून उपचार केले जातात.
रामकृष्ण मिशनच्या पिसुर्लेतील शाखेतून आजपर्यंत अनेक कातकरी बांधवांना कपड्यांसह जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत. याशिवाय निराधार असलेल्या महिलांना व मुलांना आधार देण्याचे काम रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांचे शिष्य करीत आहेत. तसेच शाखेच्या माध्यमातून आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण न घेता येणाऱ्या मुलांना प्राथमिक शिक्षण दिले जात आहेत. निराधार महिलांना विविध कौशल्यविषयक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करुन देत आत्मनिर्भर बनवले जात आहे. याशिवाय गोव्यात असलेल्या विविध वृद्धाश्रमांत असलेल्या वृद्धांना मदत करणे व त्यांची सेवा करण्याचे काम केले जात आहे.
रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांची शिकवण जनमानसांत पोहोचवण्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रम वर्षभर घेतले जात आहे. हे उपक्रम यशस्वी होण्यासाठी रामकृष्ण व विवेकानंद यांचे शिष्य काम करीत आहेत. रामकृष्ण मिशनच्या पिसुर्ले येथील शाखेचे कार्य प्रत्यक्षात पाहण्यासाठी देशभरातून नागरिक याठिकाणी भेट देत रामकृष्ण मिशनचे कार्य जाणून घेत रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांची शिकवण त्यांच्या अनुयायांकडून जाणून घेत आहेत. याठिकाणी भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अनुयायांकडून आदरतिथ्य वागणूक दिली जाते. यातून त्या व्यक्ती व शिष्यांमध्ये एक आपुलकीचे नाते तयार होते. या शाखेला अतिमहणीय व्यक्तीसह सर्वसामान्यांनी भेट दिली आहे.
या शाखेच्या परिसरात असलेल्या शांततामय वातावरणामुळे याठिकाणी भेट देणारी व्यक्तीला हे वातावरण भावते आणि रामकृष्ण मिशनच्या कार्यात आपण खारीचा वाटा उचलण्याची जाणीव निर्माण होत असल्याने ती व्यक्ती आपल्या परीने या शाखेला मदत करते. या शाखेत एक वाचनालय असून याठिकाणी रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रावर आधारित असलेले विविध भाषांमधील पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे समाजाच्या हितासाठी रामकृष्ण मिशन कार्य करीत असून ते कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत असून खऱ्या अर्थाने सामाजिकदायित्व निभावणारे रामकृष्ण मिशन आहे, असे म्हटले वावगं ठरणार नाही.
