मिनी टॉवरसाठी दांडेली ग्रामपंचायत देणार विनामूल्य जागा

सरपंच कृष्णा पालयेकर व संदीप माणगावकर यांचा पाठपुरावा : ग्रामस्थांची नेटवर्क समस्या सुटणार

बांदा ता.०४-:* मोबाइल नेटवर्कसाठी घरापासून दूर अंतरावर रानातील टेकड्या शोधत फिरावे लागते. यात विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास करिता तसेच ग्रामस्थांनाही संपर्क साधताना मोठा अडथळा येत असल्याने ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन मिनी टॉवर्ससाठी जागा उपलब्ध करून देण्याचे मान्य केल्यावर लवकरच दांडेली गावासाठी मिनी टॉवर देण्याचे आश्वासन रत्नागिरी सिंधुदुर्ग जिओचे मॅनेजर अमित मयेकर यांनी दिले.

दांडेली ग्रामपंचायत कार्यालयात नेटवर्क संदर्भात ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलेल्या अमित मयेकर यांना सरपंच कृष्णा पालयेकर यांनी टॉवर संदर्भात निवेदन दिले. यावेळी सतत पाठपुरावा करणारे संदीप माणगावकर, उपसरपंच दिनेश माणगावकर, ग्रामस्थ मेघशाम नाईक, सिद्धेश मालवणकर, मनोज माणगावकर आदी आरोस, दांडेली ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page