शेतकऱ्यांना मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी शिवार बैठक संपन्न…

किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आले आयोजन…

सावंतवाडी ता.०४-:* मोदी सरकारच्या आठ वर्षपुर्ती निमीत्त किसान मोर्चा , सिंधुदुर्ग च्या वतीने शेतकरयांना मोदी सरकारच्या विवीध योजनांची माहिती देण्यासाठी “शिवार” बैठकांचे आयोजन काल करण्यात आले होते.याचा भाग म्हणून सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे व दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी गावात शिवार बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.यावेळी किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष उमेश सावंत व कीसान मोर्चा सरचिटणीस गुरुनाथ पाटील ,उपाध्यक्ष नरे जिल्हा चिटणीस अजय सावंत ,मंडल अध्यक्ष तुकाराम आमोणेकर जिल्हा उपाध्यक्ष राणे , व दोडामार्ग मंडल अध्यक्ष यांनी मोदी सरकारच्या शेतकरयांसाठी असलेल्या विवीध योजनांची माहिती दिली. तसेच मोदी सरकारच्या योजनांचे जास्तीत जास्त लाभार्थी बनवा असे आवाहन केले.इत्यादी भाजपा कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते .

You cannot copy content of this page