आंबा काजूफळापासून वाईन निर्मिती परवानगीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

राज्य शासनाच्या गृह विभागाने परशुराम उपरकर यांना पाठवलेले पत्र

कणकवली ता.०४-:* कोकणातील काजू , जांभूळ, करवंदे व आंबा फळापासून वायनरी बनवण्यासाठी लागणारा परवाना देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे अशी माहिती मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली. याबाबत माजी आम.परशुराम उपरकर यांनी राज्याच्या गृह विभागाकडे वायनरी परवानगीबाबत माहिती मागवली होती.

याचे उत्तर गृह विभागाच्या कार्यासन अधिकारी एस.बी.आपटे यांनी उपरकर यांना दिले आहे. गृह विभागाकडे कोकणातील जांभूळ, काजू, करवंद, आंबे फळावरील प्रक्रियांबाबत वायनरी निर्मितीच्या परवानगीसाठी पत्र पाठवले होते. या पत्राला गृहविभागाने लेखी उत्तर दिले आहे. या पत्रानुसार राज्य शासनाने बियर व वाईन निर्मिती अधिनियमाखाली मंजूर करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना असल्याचे म्हटले आहे.

त्यानुसार वाईन निर्मिती करू इच्छिणारे घटक संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. त्यानंतर बीआरएलप्रमाणे मागणी करणाऱ्या व्यावसायिकांना वाईन निर्मिती परवानगी दिली जाते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काजू, आंबा, जांभूळ आणि करवंदे ही वाया जात आहेत. काही वर्षापासून कोकणी मेव्याची नासाडी होत आहे. त्यातच वातावरणातील बदलामुळे फळ उत्पादकांना फटका बसत आहे.

हापूस आंबा मे महिन्यात कॅनिंगला पाठवला जातो. त्यामुळे बागायतदारांना नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे वाया जाणाऱ्या फळापासून वायनरी बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे वायनरीसाठी परवानगी मिळू शकते. राज्य शासनाने किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी दिली आहे. या संदर्भात उपरकर यांनी राज्य शासनाकडे माहिती मागवली होती. त्यावर त्यांनी उत्तर दिले आहे.

You cannot copy content of this page