राष्ट्रवादीचा शिवसेनेला जोरदार धक्का…

मळगावचे माजी दोन सरपंच राष्ट्रवादीत

*⚡सावंतवाडी ता.२०-:* मळगावच्या दोन माजी सरपंचांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला असून, राष्ट्रवादीनी तालुक्यात शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. मळगावच्या सौ. देवयानी राऊळ आणि दत्तात्रय राऊळ यांनी राष्ट्रवादीच्या विधानसभा अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या उपस्थितीत हा प्रेवश केला आहे.

यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश1 तेंडुलकर, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, राकेश नेवगी, युवक तालुकाध्यक्ष अर्शद बेग आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page