सिंधुदुर्ग पुन्हा कोरोनामुक्त

नव्याने मिळालेले तिन्ही रुग्ण झाले बरे

ओरोस ता.२०-:* कोरोनामुक्त झाल्यानंतर मिळालेले तीन रुग्ण बरे होऊन बुधवारी घरी परतले आहेत. तर नवीन एकही रुग्ण मिळालेला नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा एकदा कोरोनामुक्त झाला आहे. आठ दिवसात तिन्ही रुग्ण बरे झाले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा ८ एप्रिल रोजी कोरोनामुक्त झाला होता. जिल्हा कोरोनामुक्त झाल्यानंतर पाच दिवसांनी १३ एप्रिल रोजी जिल्ह्यात नवीन तीन रुग्ण मिळाले होते. त्यामुळे पुन्हा जिल्ह्यात कोरोना रुग्ण सक्रिय झाले होते. मात्र, त्यानंतर सुदैवाने जिल्ह्यात एकही रुग्ण मिळालेला नाही. तर उपचार घेत असलेले तिन्ही रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना आज कोरोनामुक्त म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा आज पुन्हा कोरोनामुक्त झाला आहे.

You cannot copy content of this page