चोरट्यांपासून सुरक्षितता बाळगण्याची व्यापाऱ्यांनी उपाययोजना करावी

पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांचे आवाहन

मालवण दि प्रतिनिधी जिल्ह्यात होत असलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी सतर्क रहातानाच रात्रीच्या वेळी रोख रक्कम दुकानात ठेवू नये . शक्य असल्यास सी सी टी व्ही यंत्रणा उभारावी . आपल्या परिसरात संशयास्पदरित्या कोणी फिरत असल्यास त्याची माहिती पोलिसांच्या ११२ या टोल फ्री नंबर वरून द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांनी केले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही दिवसात तळेरे व अन्य काही भागात दुकान फोडी चोरीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गची पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. सर्व तालुक्यात खबरदारी घेतली जात आहे.

बुधवारी मालवण पोलिसांनी बाजारपेठ येथील व्यापारी तसेच बँक अधिकारी यांची बैठक पोलीस ठाणे येथे घेत खबरदारी सूचना केल्या. बँकांनी एटीएम व बँक ठिकाणी सुरक्षा रक्षक नियुक्ती करावी. सीसीटीव्ही टीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवावी. सायबर क्राईम अनुषंगानेही सतर्कता ठेवावी. अश्या व अन्य खबरदारीचा सूचना मालवणचे पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांनी उपस्थिताना दिल्या आहेत. यावेळी व्यापारी संघाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे , मंदार ओरसकर, अमित कारेकर, गणेश प्रभुलीकर, राजा शंकरदास, हिमांशू भगत, रवींद्र तळाशीलकर, विजय केनवडेकर, सरदार ताजर, दादा वाघ, शेखर गाड, सुनील देउलककर, सुहास ओरसकर आदी व्यापारी प्रतिनिधी तसेच बँक अधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page