मनसे आक्रमक; सरपंच आणि ग्रामसेवकांचे निलंबन करा-:धीरज परब..
कुडाळ ता.१३-: गावातील पाणी प्रश्नांबाबत आवाज उठवून विचारणा केल्याचा राग आल्याने गावच्या सरपंचाने “त्या” ग्रामस्थाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना काल कुडाळ तालुक्यातील एका गावात घडली आहे. यावेळी तेथे ग्रामसेवक देखील उपस्थित होते. परंतु, त्यांनी केवळ बघ्याची भुमिका घेतली होती. त्यामुळे हा पूर्वनियोजित कट असून, ग्रामसेवक आणि सरपंच यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केली आहे.
