वयपरत्वे घ्यावयाची गुडघ्यांची निघा यावर १७ एप्रिल रोजी चर्चासत्राचे आयोजन…

वेंगुर्ला मेडिकल असोसिएशन आणि नगरपरिषद वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

वेंगुर्ला ता.१३-:* वेंगुर्ला मेडिकल असोसिएशन व नगरपरिषद वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने १७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृह येथे ‘वयपरत्वे घ्यावयाची गुडघ्यांची निगा‘ यावर के.एम.सी.हॉस्पिटल मंगलोर येथील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.योगेश कामत यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

लिनेस क्लब ऑफ वेंगुर्ला, ह्युमन राईटस असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक संघटना, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ आदी सहआयोजक असलेल्या या चर्चासत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.राजेश उबाळे व मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page