जुना एसटी स्टॅण्ड येथे हनुमान जयंती

वेंगुर्ला ता.१३-:* हनुमान जयंतीचे औचित्य साधून वेंगुर्ला जुना एस.टी.स्टॅण्ड येथील मारुती मंदिरात शुक्रवार दि.१५ एप्रिल रोजी श्रीसत्यनारायण महापूजा तसेच रात्रौ ठिक १० वाजता विकास गावडे लिखित पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘हनुमान-कालिका युद्ध‘ हा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन हौशी तरुण मंडळ, जुने एस.टी.स्टॅण्ड यांनी केले आहे.

You cannot copy content of this page