अनधिकृत खाणकामांवर तातडीने कारवाई करा…

मनसेची प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

सावंतवाडी ता.०७-:* तालुक्यात सुरू असलेल्या अनधिकृत खाणकामांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे कडून प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन त्यानी आज प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांची भेट घेऊन त्यांना दिले आहे.

यावेळी जिल्हा सचिव बाळा पावसकर, मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, तालुका सचिव राजेश टगंसाळी, उप तालुका अध्यक्ष प्रकाश साटेलकर, निलेश पेंडूरकर, विश्वनाथ राऊळ, विष्णू वसकर, मंगेश वरक, भास्कर सावंत, आकाश परब, साहिल पवार आदी उपस्थित होते

यावेळी येत्या १५ दिवसात या अनधिकृत खाणकाम व क्रशर प्लांड वर दंडात्मक आणि कठोर कारवाई न झाल्यास मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page