मालवणी बझारच्या मिरची महोत्सवाचा शुभारंभ

मालवण ता.०७-:* मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लि., मालवण संचलित मालवण येथील मालवणी बझार या संस्थेतर्फे मिरची महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला असून विविध प्रकारची मिरची या महोत्सवात उपलब्ध करण्यात आली आहे. या मिरची महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रताप बागवे, संचालक श्रीकृष्ण तळवडेकर, संचालक एम. आर. सोनवडेकर, संचालिका श्रीमती ए. एन. हर्डीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. परब, ग्राहक, कर्मचारी आदी उपस्थित होते..

मिरची महोत्सव १२ एप्रिल पर्यंत सुरू राहणार असून सकाळी ८.३० ते सायं ६.३० या वेळेत मिरची महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरची महोत्सवात बॅडगी, रायचूर, गुंटूर अशी विविध प्रकारची दर्जेदार मिरची व गरम मसाला सामान माफक दरात खरेदी करता येणार असून जनतेने या मिरची महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालवणी बझार, मालवण तर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page