देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा;शिवसेनेचे देवगड पोलिसांना निवेदन
देवगड ता.०७-:* आय एस एस आय एन आय एन एस यांच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशाचा किरीट सोमय्या मे घोटाळा करून देशाशी गद्दारी केली आहे. त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ तुरुंगात टाकण्यात यावे. अशी मागणी देवगड तालुका शिवसेनेच्यावतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवगड पोलीस स्थानक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी तालुकाप्रमुख विलास साळसकर, मिलिंद साटम, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, शिक्षण सभापती संतोष तारी नगरसेवक विशाल मांजरेकर, रवींद्र जोगल व अन्य उपस्थित होते. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे २०१३ मध्ये आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी किरीट सोमय्या यांनी मोहीम सुरू केली. केंद्र व राज्य सरकारने असमर्थता दर्शविल्याने किरीट सोमय्या पुढे आला आणि प्रचंड निधी गोळा केला त्यासाठी रेल्वे स्थानकावर, विमानतळ डबा घेऊन उभा राहिला. आयएनएस विक्रांत देशाच्या दृष्टीने अभिमानाच्या असल्याने लोकांनी सढळ हस्ते दान केले.
नेवी नगर मध्ये राहणाऱ्या नौदलाच्या अनेक अधिकाऱ्यांनी प्रत्येकी ५ ते १० हजार रुपये याप्रमाणे रक्कम दिली. या रकमेचा किरीट सोमय्या ने काय केले? ते देशाला समजायला हवे ही रक्कम ते भंगारात जाऊ पाहणाऱ्या विक्रांत युद्धनौकेचे स्मारक बनविण्याकरिता राजभवन येथे जमा करून त्याने गोळा केलेली रक्कम राजभवनाला मिळाली नसल्याचे आरटीआय मधून समोर आले आहे. लोकांच्या देशप्रेमाची खेळून किरीट सोमय्यांनी गद्दारी केली आहे त्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा किरीट सोमय्यानी या विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या निधीचे काय झाले हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण तो देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. लोकांनी मोठ्या विश्वासानं विक्रांत वाचविण्यासाठी देणगी दिली.
राजभवन कडून आपल्याला किरीट सोमय्या कडून कोणत्याच निधी किंवा चेक मिळाला नसल्याची माहिती अधिकाराखाली मागविलेल्या उत्तरावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.किरीट सोमय्यानी जमा केलेला पैसा जमा झाला नाही मग तो कोणाच्या खिशात गेला हा पैसा कोणी खाल्ला त्याचे उत्तर राज्यातील जनतेला मिळावा या घोटाळ्यात किरीट सोमय्या आणि अंदाजे १०० कोटींचा घोटाळा करूनही हे पैसे त्यांच्या बांधकाम व्यवसाय करता तसेच निवडणूक खर्च करता वापरण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अशा देशद्रोही कृतीमुळे सोमय्याला राज्यात काय देशातही राहण्याचा खरेच अधिकार नाही. या देशद्रोह्यांची जागा तुरुंगातच असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातील तसेच देशातील जनता या प्रश्नाचे उत्तर किरीट सोमय्या तसेच भाजपकडून मागत असल्याचे यांना या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
