आशिष शेलार यांचा राज्य सरकारला इशारा
*💫सावंतवाडी दि.१० -:* राज्य सरकार असुरक्षित मनोवृत्तीचे असल्यानेच त्यानी विरोधी पक्षातील नेत्यांची सुरक्षा काढून घेण्याचे कृत्य करत असल्याची टीका आशिष शेलार यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. तसेच यावेळी ते म्हणाले की, आपला हा दौरा प्रचारासाठी नसून होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी असून, या निवडणुकीचा प्रचार स्थानिक पातळीवरच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कॉंग्रेस मुंबईत करत असलेल्या दोन आयुक्तांच्या मागणीला भाजपचा विरोध असून, मुंबईचे दोन तुकडे होऊ देणार नाही असे देखील त्यांनी ठणकावून सांगितले आहे. यावेळी ते म्हणाले की यात शिवसेना गप्प राहून कॉंग्रेस ला मुक संमती देत आहे. शिवसेनेने कॉंग्रेस ला या कामात आपली असमंती दर्शवण्यासाठी खडेबोल सूनवावेत किंवा सत्तेतून हाकलून द्यावे असा सल्ला देखील दिला आहे. कोकणात दाखवत असलेले वर्चस्व हा शिवसेनेचा दिखाऊपणा असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. कोकणात सद्य स्थितीत भाजप मोठ्या प्रमाणात सक्रिय असून येणाऱ्या काळात ते स्पष्ट होईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
