युग संपले, भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

मुंबई ता.०६,: लतादीदी या संगीत युगाचा इतिहास होता. त्यांनी संगीताच्या माध्यमातून भारताचा नाव जगात पोहोचवलं. त्यांनी अनेक भाषांमध्ये गायन केलं. त्यांच्या निधनानं देशाची आणि संगीत क्षेत्राची हानी झाली आहे. महाराष्ट्र आणि मुंबई, गोवा आणि संस्कृतीसाठी त्या जोडलेल्या होत्या. त्या आपल्यामध्ये नाहीत. पण, त्यांचं संगीत आणि त्यांनी गायलेली गाणी आपल्यासोबत असतील. त्यांच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो.

त्या आमच्या देशाच्या अभिमान होत्या. संगीत आणि गायनाच्याद्वारे देशाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून दिला. त्यांनी 75 ते 80 व्या वर्षी आवाज दिला तरी तो 20 वर्षाच्या मुलीच्या आवाजासारखं त्यांचा आवाज वाटायचा. महाराष्ट्राच्या संस्कृतीशी त्यांचा संबंध होता. लतादीदी यांचा आधार आम्हाला होता.

You cannot copy content of this page