कणकवली ता.०६-:* भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ट्रान्स्पोर्ट विंगच्या रस्ता सुरक्षा मोटरसायकल अभियानाचे आयोजन ब्रह्माकुमारीज विद्यालय कणकवलीच्यावतीने रविवार ६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.
रस्ता सुरक्षा जनजागृती बरोबरच रस्ता सुरक्षा जबाबदारीचे मार्गदर्शन , युवकांसाठी नियम पालन करण्याची प्रेरणा देणे ,वेग, सुरक्षा आणि आध्यात्मिकता या विषयी जागृती करणे या उद्देशाने हे अभियान विद्यालयापासून सुरु होऊन जानवली येथून कणकवली शहरात दाखल होणार आहे. या अभियानाचे उद्घाटन ब्रह्माकुमारीजच्या गोवा सिंधुदुर्ग संचालिका राजयोगिनी ब्र. कु. शोभा दीदी,एसटीचे कणकवली डेपो मॅनेजर प्रमोद यादव ,ट्राफीक विभागाचे कणकवली येथील पोलीस श्री. माने यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हे अभियान दि. ६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ से ६ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाचा मार्ग ब्रह्माकुमारीज विद्यालय जानवली – मुंबई -गोवा महामार्ग कणकवली -पटवर्धन चौक – बाजारपेठ -पटकीदेवी पर्यंत चालणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा जनजागृती बरोबरच रस्ता सुरक्षा जबाबदारीचे मार्गदर्शन करण्यात येणार असल्याने नागरिकांनी तसेच स्वयंसेवी संस्थांनी ब्रह्माकुमारीजच्या जानवली येथील विद्यालयस्थळी उपस्थित रहावे असे आवाहन ब्रह्माकुमारीजच्या कणकवली विद्यालयाच्या संचालिका ब्र.कु.संध्या दीदी यांनी केले आहे.
