ग्रंथ माणसाला सशक्त,सजग आणि सुजाण बनवतात

कणकवली वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पिरखान यांचे प्रतिपादन

*⚡कणकवली ता.२७-:* ग्रंथ कधी माणसाचं रूप घेतात.तर कधी निसर्ग बनून दर्शन देतात. कधी हेच ग्रंथ परिस्थिती बनून समोर येतात आणि आपल्याला सशक्त, सजग आणि सुजाण बनवतात म्हणूनच प्रत्येकाने ग्रंथांशी मैत्री केली पाहिजे.प्रत्येक वाचकाने वाचन संस्कृती आत्मसात केली पाहिजे असे प्रतिपादन वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पिरखान यांनी केले.

कणकवली नगरवाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यवाह हनीफ पिरखान यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते. कार्यकारणी सदस्य महेश काणेकर, नगरसेविका मेघा गांगण,प्रतीक्षा सावंत,मेघा सावंत, पी.जे.कांबळे,रविंद्रनाथ मुसळे, वैजयंती करंदीकर,दादा कोरडे,पालक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविकेत बोलताना,पी.जे.कांबळे म्हणाले, थोर पुरुषांची आत्मचरित्रे वाचल्यानंतर स्फुर्ती मिळते. व्यक्तीमत्त्व घडते. आदर्श व्यक्ती घडण्यासाठी वाचन ही काळाची गरज आहे. तसेच नगरवाचनालयाच्या माध्यमातुन नवनविन पुस्तके उपलब्ध करून वाचक संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह हनिफ पीरखान,कार्यकारणी सदस्य महेश काणेकर,नगरसेविका मेघा गांगण,प्रतीक्षा सावंत,मेघा सावंत,पी.जे.कांबळे,रविंद्रनाथ मुसळे,वैजयंती करंदीकर,दादा कोरडे,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page