मालवण (प्रतिनिधी) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने राठीवडे येथील धुरी कुटुंबीयांना दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. श्रीमती आदिती शंकर घुरी यांचे १८ जानेवारी रोजी निधन झाले. निधनाचे वृत्त समजल्यानंतर जिल्हा बँकेच्या विरण शाखेकडून धुरी यांचा विम्याचा प्रस्ताव सादर केल्यानंतर तो मंजूर होऊन २ लाख रुपये रक्कमेचा धनादेश विरण शाखेतर्फे देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डान्टस, संदीप ऊर्फ बाबा परब, मेघनाद धुरी, तालुका विकास अधिकारी विश्वनाथ डोर्लेकर, सुरज गवंडी, संदिप मर्गज, पुर्णानंद सरमळकर व विरण शाखाव्यवस्थापक श्री. पाताडे आदी उपस्थित होते.
