माळगाव हुमरोसवाडी ग्रामस्थांचे उपोषण आश्वासनानंतर मागे

मालवण ता.२७-:* माळगाव हुमरोसवाडी या नादुरुस्त रस्त्यासाठी निधी मंजूर होऊन टेंडर प्रक्रियाही पूर्ण झाली. मात्र ठेकेदार काम सुरू करत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी मालवण पंचायत समिती कार्यालया समोर उपोषण छेडले. तात्काळ रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण काम सुरू झाले पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.

दरम्यान, उपविभागीय अभियंता जि.प. बांधकाम उपविभाग मालवण यांनी माळगाव हुमरोस रस्ता संबंधित यंत्रणेकडून ३१ मार्च २०२२ पर्यत पूर्ण करून देण्याची लेखी हमी दिल्याने ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. यावेळी पांडुरंग परब, विष्णू परब, सुदर्शन परब, देविदास परब, अनिल परब, अमित परब, रोहन परब, हेमंत नाईक, पद्माकर परब, अजान परब, मंगेश परब, सुनिल परब, गुरुनाथ परब, अर्जुन परब, तुकाराम (बंडु) माळकर, नाना ठाकूर, रितेश परब, नंदकिशोर कासले, दिपक चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते. युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनीही ग्रामस्थांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला.

You cannot copy content of this page