मालवण -: मत्स्यविभागाचे अधिकारी दडपणाखाली असल्याने ते तक्रार देण्यास घाबरत असल्याचेही सावजी यांनी पोलिसांना सांगितले. अनधिकृत मच्छिमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाचे अधिकारी आणि तीन सागर सुरक्षा रक्षक असे चारजणांचे पथक आचरा जेटीवर शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास गेले असता त्यांच्यावर हल्ला झाल्याची चर्चा किनारपट्टीवर आहे. मात्र मत्स्य विभागाकडून या संदर्भात कुठल्याही प्रकारची तक्रार पोलिसात देण्यात आली नव्हती. मत्स्य अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर रविवारी स्थानिक पारंपारिक मच्छिमार आक्रमक होऊन हा हल्ला पर्ससीन व एलईडी धारक मच्छीमारांनी केल्याचा आरोप केला होता. याबाबत पारंपारिक मच्छीमारांनी मत्स्यव्यवसाय आयुक्त रवींद्र मालवणकर यांची भेट घेऊन हा हल्ला हलक्या पद्धतीने घेऊ नका, स्थानिक बेकायदेशीर पर्ससीन आणि एलईडी मच्छिमारांच्या अश्या प्रवुतीला आळा घाला अशी मागणी केली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी अद्यापही तक्रार न दिल्याने मालवण येथील पारंपरिक मच्छिमार संघटनांच्या वतीने आज मच्छिमार नेते छोटु सावजी यांनी या हल्ल्याची थेट सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी मागणी मालवण पोलिसांकडे केली.
*⚡मालवण ता.२५-:* आचरा बंदरात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई करण्यास गेलेल्या मालवण येथील सहाय्यक मत्स्यव्यवसाय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकावर केलेल्या हल्ल्याची सीबीआय कडुन चौकशी करावी, अशी मागणी मालवण पोलिसांकडे केल्याची माहिती मच्छिमार नेते छोटु सावजी यांनी दिली आहे.
