कणकवली अर्बन निधी लिमिटेडचा उद्या शुभारंभ

विनम्र व तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न करणार:प्रा. हरीभाऊ भिसे

*⚡कणकवली ता.२५-:* कणकवली अर्बन निधी लिमिटेड या वित्तीय संस्थेच्या माध्यमातून विनम्र व तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सर्व सभासदांची व संस्थेची भरभराट करण्यासाठी सर्वांचे योगदान अपेक्षित आहे, यासाठी संस्थेचे भागदारक(शेअर होल्डर) होऊन व खातेदार होऊन साथ द्यावी.तसेच कणकवली अर्बन निधी लिमिटेड या वित्तीय संस्थेचा २६ जानेवारी रोजी तहसीलदार आर. जे. पवार आणि प्रांताधिकारी श्रीम.वैशाली राजमाने यांच्या हस्ते शुभारंभ होणार असल्याची माहिती चेअरमन प्रा. हरीभाऊ भिसे यांनी दिली.

भारत सरकार मान्यता प्राप्त कणकवली अर्बन निधी लिमिटेड या संस्थेच्या रूपाने कणकवली शहर व तालुकावासीयांच्या सेवेत दाखल झाले आहोत याबाबत कणकवली येथे हॉटेल साई पॅलेस येथे पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली यावेळी चेअरमन प्रा.हरीभाऊ भिसे , सेक्रेटरी रंजन चव्हाण,ट्रेझरर प्रितम पारकर,दीपक बेलवलकर,अमर पारकर,कर्मचारी प्राज्वल प्रफुल्ल राणे,विदा विशाल वाळके, यश घाडीगावकर, प्रज्ञेश मिते, चेतन साटम तसेच सर्वेश भिसे व अन्य उपस्थित होते. प्रा. भिसे म्हणाले, ,या वित्तीय संस्थेमध्ये लखपती योजना ,सुलभ शिक्षण योजना,मुदत ठेव योजना, पेंशन योजना, मासिक ठेव योजना अशा विविध आकर्षक योजनांचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे तसेच विविध कर्ज सुविधा देखील यासंस्थेमार्फत नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. भारत सरकारच्या निधी कंपनीच्या उद्देशानुसार कामगार वर्ग भाजीविक्रेते, छोटे मोठे व्यावसायिक,उद्योजक, शासकीय अशासकीय सेवेतील सेवा निवृत्त कर्मचारी अशा सर्व स्तरातील लोकांना बचतीची सवय लावणे त्यावर योग्य स्वरूपात व्याजरूपी परतावा देणे व त्यांच्या अडीअडचणीच्या काळात त्वरित व माफक व्याजदरात बचतीच्या आधारावर व तारण कर्जाची उपलब्धता करून देणे असा संस्था स्थापने मागचा उद्देश आहे .या संस्थेच्या तीन शाखा करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.

You cannot copy content of this page